
(सस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगावच्या आठ वर्षाच्या मुलीला धनुका कंपाउंड शेगाव मधील पाच सहा कुत्र्यांनी हल्ला चढवला आणि या हल्ल्यात रित चौधरी ही आठ वर्षीय मुलगी गंभीर झाली होती. त्यावर अकोला येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आज दिनांक ७ मार्च 2024 पर्यंत शेगाव नगरपालिकेचे प्रशासन या भटक्यान कुत्र्यांपासून बेदखल असून अजूनही धानुका कंपाउंड व परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर सुरू आहे. यामुळे परिसरातील लोक खूपच घाबरलेले आहेत नुकतेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध गोपाल राधेश्याम चौधरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. आज लखपती गल्लीतील सौरभ टिबडेवाल यांच्या लहान मुलाला सुद्धा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे नगरपरिषद प्रशासन अजूनही झोपेतच असून लोकांना होणाऱ्या त्रासाची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी. आणि मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासी करीत आहे.



