बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ज्ञानेश्वरी हे आदर्श मानवी जीवनाचा आरसा होय.श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.


भगवानश्री ज्ञानोबारायांच्या मातृहृदयाला फुटलेला प्रेम पान्हा किंवा ग्रंथरूपाने अत्यंत प्रेमाने पान्हा पाजणारी पुरुष देहधारी अलौकिक जगन्माता ज्ञानराज माऊलीचे वांङ्मयीन स्वरूप,अमूर्त असणाऱ्या ज्ञानाच्या ईश्वराची प्रत्यक्ष अक्षर मूर्ती,नव्हे नव्हे ईश्वरीय ज्ञानाचे कधीही न कोमेजणारे नित्य नूतन सुवर्ण पुष्प , आपल्याला आपल्या चित्राचे( फोटो )नव्हे तर,चरित्राचे सुस्पष्ट दर्शन घडविणारा आदर्श मानवी जीवनाचा आरसा म्हणजे भगवानश्री ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी होय असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ते आज जगद्मान्य अद्वितीय स्वरूप असणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या परिष्करण अर्थात जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री ज्ञान भास्कर सेवा समिती द्वारा आयोजित दक्षिण भारत तीर्थयात्रेतील शेकडो वारकऱ्यांसमेवेत सामूहिक हरीपाठानंतर कन्याकुमारी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे तात्विक चिंतन करीत असतांना प्रवचन प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले की,आत्मोद्धाराकरिता प्रयत्नरत असणाऱ्या प्रत्येक साधकांच्या जीवनात आत्मसाक्षात्काराचा चमत्कार घडविणारा ग्रंथ , कष्टप्रद योग साधना करून नव्हे तर , केवळ सुलभ श्रवणमात्राने समाधी सुख प्राप्त करून देणारा ग्रंथ , जिज्ञासू साधकांना स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती बनविणारा ग्रंथ,परतत्वसाक्षात्काराचा चमत्कार घडविणारा ग्रंथ,संत्संगासह व्यासंगहि वाढविणारा ग्रंथ , ईश्वरीय ज्ञानाचा अक्षय ठेवा असणारा ग्रंथ,संसाराप्रतीच्या प्रीतीतून नव्हे तर , प्रतितीतून निर्माण झालेला ग्रंथ. प्रत्येक अक्षरा अक्षरात आत्मसाक्षात्काराचे सामर्थ्य असणारा व विधीनिषेधाचे बंधन रहित मंत्र रूप ग्रंथ , संसारपथश्रांतांचे विश्रांतीच्या हक्काचे स्थान असणारा ग्रंथ, कुठल्याही उपाङ्गाशिवाय केवळ श्रवणेंद्रिया द्वारा अश्वमेध घडविणारा यज्ञरूप ग्रंथ ,आबाल वृद्धांना त्यांच्या योग्यतेनुसार उपदेश करून त्या सर्वांना अधिकारी बनविणारा ग्रंथ , वेदोपनिषदादि समग्र वैदिक वाङ्मयाचे पाचक स्वरूप असणारा ग्रंथ , सिद्धांईचा बडिवार नव्हे तर , साधकांना सिद्धावस्था प्राप्त करून देण्यासाठी दिलेला उपहार अर्थातच माऊलीच्या जीवनातील सर्वांसाठी झालेला आणि सर्व काळी उपयुक्त असणारा व केवळ वाचन किंवा श्रवणमात्रांने आत्मदर्शन घडविणारा सर्वात मोठा चमत्कार , अज्ञान निवृत्तीसह ज्ञानप्राप्त करून देणारा तसेच लहान थोरांना मोक्षचे सरसकट दान देण्यास स्वतंत्र असणारा ज्ञान प्रधान ग्रंथ,विविध उपमा व शब्दालंकाराने नटलेली चिरतरुण ज्ञानेश कन्या तसेच शद्बा़च्या माध्यमातून भगवान पंढरीशांच्या हृदयापर्यंत पर्यंत पोहचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी होय.
माऊलीचे अलौकिक चिरंतन दिव्य स्वरूप , अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा गंगाजळी स्वरूप अक्षय ठेवा , ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात हे जो ग्रंथ वाचल्याशिवाय कधीच कळू शकत नाही त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. किंबहुना मानवी जीवनातील सर्वच प्रश्नांचे सटीक उत्तरे,शंकांचे समाधान , समस्यांचे निराकरण व आक्षेपाचे खंडन समर्थपणे करणारा ग्रंथ म्हणजेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी होय.तसेच कन्याकुमारी देवीची पौराणिक कथा व महात्म्य आपल्या ओघवत्या वाणीने पटवून दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button