अपघातमुक्ताईनगर

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी:

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी:

-(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणण्यात आलेले होते त्यांना बघून पूर्णाड गावी परतत असताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांचा समोरून येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे यांच्या गाडीला समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघात होऊन त्यामध्ये अशोक गंगाराम सावळे हे हे सुद्धा गंभीर जखमी झालेले आहे या अपघातात रोहित मुकेश गाढे वय 19 पूर्णाड तसेच प्रदीप छगन वाघ वय 28 पूर्णाड असे दोघे मयत झालेले असून कमलेश सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे चांगदेव तसेच अशोक गंगाराम सावळे पातोंडी तालुका रावेर येथील रहिवासी गंभीर जखमी झालेले होते अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष एडवोकेट रोहिणीताई खडसे यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर गाठून जखमी रुग्णाची भेट घेतली त्यावेळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली एकाच गावातील आधी एकाने आत्महत्या केल्यामुळे आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button