संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक संकल्प दिनानिमित्त विशेष असा कार्यक्रम आयोजित!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर दि.२३/९/२६ सविस्तर वृत्त असे की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ बुधवार दि.२३/९/२०२६ रोजी सायंकाळी ठीक आहे ८.०० वाजता संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथे विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपरोक्त माहितीनुसार १९१७ मध्ये बडोदा येथे सयाजीराव गायकवाड उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पुढील सामाजिक संघर्षासाठी संकल्प केला, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा तशीच वंचित बहुजन आघाडीच्या संग्रामपूर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष त्यांची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबाबत वैचारिक चर्चा व प्रबोधन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर भाऊ भिडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संग्रामपूर तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे यांनी केले आहे. सदर कार्यक्रम हा संग्रामपूर तालुक्यातील निरोड या स्थळी ठेवण्यात आला असून सायंकाळी ठीक ८.०० या कार्यक्रमाची वेळ ठेवण्यात आलेली आहे



