खामगाव MIDC मध्ये FDA ची धडक कारवाई AM OELS PVT.LTD कंपनी वर धाड साडेतीन कोटी रुपयांचे बोगस खाद्यातील जप्त,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण
बुलढाणा – (दि.01 ऑक्टोबर) येथे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर एफ डी ए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये मोठी कारवाई केली आहे, खामगाव एमआयडीसी मधील AM OELS .PVT.LTD.( प्लॉट नंबर A-14) या कंपनीवर धाड टाकून तब्बल साडेतीन कोटी रुपयाचे बोगस खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे,
या कंपनीत गेले अनेक दिवसापासून विनापरवाना खाद्यतेलाचे उत्पादन सुरू असल्याचे गोपनीय माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA च्या पथकाने अचानक कंपनीवर छापा टाकला तपासणीत कंपनीकडे खाद्यतेल उत्पादनाचा कोणताही वैद्य परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून कंपनीच्या गोदामात मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे निकृष्ट ,आणि बोगस खाद्यतेल आढळले , या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना ऐकता तुकाराम मुंडे म्हणाले. विनापरवाना आणि माणसांचे पालन न करता खाद्यतेलाचे उत्पादन सुरू होते, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा कंपन्यावर कडक कारवाई करण्यात येईल हा संपूर्ण साठा आम्ही सिल केला आहे, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीने यापूर्वी मोठ्या प्रमाणात हे बोगस तेल बाजारात वितरित केले आहे हे तेल बुलढाणा जिल्ह्यासह अजून कुठे कुठे पाठवण्यात आले . कोणत्या किराणा दुकानदारांना, किंवा हॉटेल व्यवसायिकांना विकले गेले, याचा शोध प्रशासन घेत आहे वितरित झालेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, या कारवाईमुळे खामगाव एमआयडीसी मधील बोगस कारभार उघडकीस आला असून भेसळखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे,



