जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय तायक्वांडो स्पर्धांचे श्री. व्ही. एस. नाईक कॉलेज येथे यशस्वी व उत्साहात आयोजन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय तायक्वांडो स्पर्धांचे श्री. व्ही. एस. नाईक कॉलेज येथे यशस्वी व उत्साहात आयोजन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर
श्री व्ही एस नाईक महाविद्यालय, रावेर यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक 21 फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत अंतर विभागीय तायक्वांडो (पुरुष व महिला) स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा श्री व्ही एस नाईक महाविद्यालय, रावेर येथे उत्साहात पार पडल्या.
विशेष बाब म्हणजे, या स्पर्धा सेंसर सिस्टीमने घेतलेला असून अशा तंत्रज्ञानाचा वापर आंतर विद्यापीठ स्पर्धेत केला जातो जेणेकरून स्पर्धेचा निकाल योग्य रीतीने होईल, . सदर स्पर्धेत जळगांव विभाग, धुळे विभाग,नंदुरबार विभागातील खेळाडूंचा समावेश होता सदर स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथील खेळाळू जळगाव विभागाकडून खेळताना पुष्पक महाजन, मानसी पाटील,नंदीनी महाजन, अनुश्री वाणी, जागृती न्हावी, यांनी गोल्ड मेडल पटकीवेले
स्पर्धेचे उद्घाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ पी डी पाटील यांनी केले त्यांच्या मार्गदर्शन भाषणात त्यांनी रावेर महाविद्यालय जिमखाना चे कौतुक केले तसेच खेळाडूंनी जास्तीत जास्त पथक विद्यापीठाला प्राप्त करून देण्याचे सांगितले खेळाडू देशात असताना खेळाडूंनी शिस्त व संयमाने खेळाकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे मॅनेजमेंट सदस्य प्रतीक नाईक उपप्राचार्य डॉ संदीप धापसे, उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. सुभाष वानखेडे, क्रीडा विभाग आभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ गोविंद मारतळे धनाजी नाना महा फैजपुर, निवड समती सदस्य डॉ महेश पाटील, शेदुर्णि महा, डॉ तेजस शर्मा थाडनेर महाविद्यालय शिरपूर, डॉ मुकेश पवार, भालोद महा, डॉ विजय शिंदे संघ व्यवस्थापक धुळे विभाग, पाटील नंदुरबार विभाग संघ व्यवस्थापक जिमखाना समिती सदस्य प्रा चतुर गाडे,डॉ ए. एन सोनार, , तेजस दसनुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणुण जयेश बावीस्कर, निकेतन खोडके,बलवंत बोबडे व दिपेंद्र सिंग बीस्ट,प्रणव भोई यांनी काम पाहीले
ही स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नियमानुसार तसेच श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या.
विद्यापीठ स्तरावर या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या क्रीडा संधी उपलब्ध होणार आहेत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या स्पर्धेतुन अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी संघ निवड होणार असुन दिनांक 18 ते 22 मार्च २०२६ रोजी मुलांच्या जालंदर व मुलींचे ओडिसा येथे होणार आहेत. स्पर्धाचे सुत्रसंचालक डॉ उमेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ मुकेश पवार यांनी केले, स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख युवराज बिरपण, सुनील मेढे, सतीष वाघ, वीरेंद्र चौधरी,पुष्पक महाजन,मानसी पाटील, हेमंत यांनी प्रयत्न केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button