चिखली कॉंग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्रींची जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस, आवाज न्यायाचा
चिखली. ता. प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
महापुरूषांच्या त्याग व सर्मपणाचा आदर्श युवकांनी घ्यावा – डाॅ. इसरार
चिखली : 02 ऑकटोबर2026
आजिवनभर अहिंसेच्या मार्गाने इंग्रजा विरूध्द लढा देत भारत देशाला स्वातंत्र मिळवून देणा-या राष्ट्रपीता महात्मा गांधी व देशाला जय जवान जय किसान चा नारा देवून सिमेचं रक्षण करणा-या जवाना बरोबरच देशाच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावणा-या शेतक-यांचे अनन्य महत्व देषाला पटवून देणारे माजी पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांची आज चिखली कॉंग्रेसच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रपीता महात्मा गांधी तथा माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी सत्य अंहिसा, सद्भावना, सर्वधर्म समभाव, परीश्रम इत्यादी दिषा दर्शक तत्वांना मौलाचे महत्व दिले. राष्ट्र निर्मीतीत महत्मा गांधी तथा स्व. लालबहादुर शास्त्री यांच्या जिवनातील त्याग व सर्मपणाचा युवकांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे उपाध्यक्ष डाॅ. मोहमंद इसरार यांनी महापुरूषांना विनम्र अभिवादन प्रसंगी केले.
माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालयात चिखली काॅग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी या महापुरूषांचे स्वातंत्र लढयातील योगदान व त्यांच्या जिवन चरित्रावर उपस्थित पदाधिका-यांनी आपल्या भाषनातुन प्रकाष टाकला. यावेळी बुलडाणा जिल्हा काॅगे्रसचे उपाध्यक्ष डाॅ.मोहमंद इसरार,रामभाऊ जाधव, अतहरोद्यीन काझी सचिन बोंद्रे, नगरसेवक आसिफ भाई, गोपाल देव्हडे, वायाळ सर, गोकुळ शिगणे, शेख जाकीर भाई ,खलील बागवान, डाॅ. रविंद्र कमळस्कर, भास्कर चांदोरे, राहुल चवरे, विनोद बोर्डे, मलीक जमदार, राहुल इंगळे, अब्रार बागवान, राजु लहाने, अषोक पडघान एलआयसी, डाॅ. संजय घुगे, अकाष पडघान, संजय गिरी, शेख अज्जु, शकील भाई, विषाल रिंढे, यावेळी जिल्हा, चिखली काॅगे्रसच्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून या महापुरूषांना विनम्र अभिवादन केले. तसेच राष्ट्रपीता महात्मा गांधी पुतळा व परीसराची साफसफाई करण्यात आली✍️



