खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाभुसावळमहाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

मैत्रेय बुद्ध विहारात राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प संपन्न

मैत्रेय बुद्ध विहारात राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प संपन्न
‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ विषयावर जयपाल धुरंधर गुरुजींचे मार्गदर्शन
भुसावळ प्रतिनिधी :
नालंदा नगर, भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व महिला शाखेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.

यावेळी आयु. जयपाल धुरंधर गुरुजी, बौद्धाचार्य तथा जळगाव तालुका सचिव, यांनी ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा, जळगाव जिल्हा पूर्वच्या अध्यक्ष आदरणीय प्रियंका ताई अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बोधिसत्वाच्या संकल्पनेवर सखोल विवेचन
प्रवचनादरम्यान जयपाल धुरंधर गुरुजी यांनी बोधिसत्व संकल्पनेचे विविध पैलू स्पष्ट केले. बोधिसत्व म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर असलेली व्यक्ती; जी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता इतर प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आणि दुःखमुक्तीसाठी कार्य करण्याचा संकल्प करते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत त्यांनी बाबासाहेबांनी दहा पारमितांचे आचरण आपल्या कार्यातून कशा प्रकारे अधोरेखित केले, याची विविध उदाहरणे देऊन सोप्या भाषेत मांडणी केली. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना बौद्ध धम्मातील बोधिसत्व संकल्पना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा संबंध समजावून सांगण्यात आला.

महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह उपासक-उपासिकांची उपस्थिती
या मंगल प्रसंगी आयु. नी. सीमाताई अहिरे (केंद्रीय शिक्षिका), आयु. राजरत्न अहिरे, घायतडक ताई, प्रतिभाताई शिरतुरे, सुजाताई जंजाळ, अनुसयाबाई अहिरे, प्रभाताई जाधव, वर्षाताई जाधव, शिवानीताई घायतडक, अश्विनीताई जाधव, गायकवाड ताई, सोनवणे ताई, वैजयंता बाई कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने शील, श्रद्धावान उपासक-उपासिका तसेच बालक व बालिका उपस्थित होत्या. धम्म प्रवचनामुळे विहार परिसरात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका ताई अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीमाताई अहिरे यांनी मानले. उपस्थितांच्या सहभागाने राष्ट्रीय वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प उत्साहात संपन्न झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button