अपघात

“वाशिम -रिसोड राज्य मार्गावर ५१ वर रिठदजवळ अपघात, अपघाताची मालिका सुरूच”.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ या रस्त्यावर गावाजवळ अडोळ नदीवरील फुलावर वारंवार अपघात होत आहे यामध्ये दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० दरम्यान वाशिम वरून येत असलेले तिघेजन मेहकर तालुक्यातील बोरी येथील संतोष नामदेव साठे, रोहन संतोष घनघाव, दीपक अंबादास साठे, वाशिम -रिसोड रस्त्यावरील रिठद गावाजवळील अडोळ नदीच्या पुलावर धडकले असून जास्त वळण रस्ता असल्याने मोटरसायकल क्रमांक एम एच २८ बी एस ७७६० होंडा शाईन कंपनीची होती. तिचा संपूर्ण गाडीचा चुराडा झाला असून तीनही लोकांचे हात पाय तुटले होते त्यांना रिठद येथे मुक्कामी उभी राहात असलेल्या ॲम्बुलन्स मध्ये टाकून वाशिम येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यासाठी पोलिस शेख व अंभोरे व उपस्थित असलेल्या नागरिकांनी सहकार्य केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button