खामगाव-औद्योगिकवसाहतीतील मेसर्स एमपी ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाच्या खामगाव एमआयडीसीत २४८ टन सोयाबीन तेलाचा साठा जप्त वैध परवाना नसल्याने ३.५० कोटींचा साठा ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:गजानन तांगडे
बुलढाणा पथकाने कारवाई करत तब्बल २४८.८ टन रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. या तेलाची किंमत सुमारे ३ कोटी ७० लाख ६७ हजार २०१ रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित आस्थापनेची तपासणी केली असता, तेथे अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच साठविण्यात आलेल्या रिफाइंड सोयाबीन तेलाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणातील तेलसाठा ताब्यात घेण्यात आल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनेकडून वैध परवान्याशिवाय अन्न व्यवसाय केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर साठविण्यात आलेल्या रिफाइंड सोयाबीन तेलाच्या गुणवतेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल् असून, विश्लेषणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसणे तसेच तेलाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेला संशय या दोन्ही बाबींची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तेलाचा दर्जा निर्धारित मानकांनुसार आहे किंवा नाही, हे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट होणान आहे. ही कारवाई सहायक आयुक्त पी. एस. पाटील व सहआयुक्त एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकात अन्न सुरक्षा अधिकार जी. के. बसावे आणि ए. एस. भोपाळे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग होता.



