गुन्हेगारीजळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

मिलिंद बोदडे टोळीचे जेल बंद व साथीदार एरोनडोल शहरातील ऑईल मिलमध्ये खंडणी मागणाऱ्या टोळीस अटक….

एरंडोल शहरातील ऑईल मिलमध्ये खंडणी मागणाऱ्या टोळीस अटक….

. प्रेसनोट

एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे प्रेसनोट देण्यात येते की, आनंद अनिल काबरे, रा. मारवाडी गल्ली, एरंडोल यांचे वडील नामे अनिल गणपती काबरे यांना एक पुरुष व एक महिलेने त्यांचे ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून त्यांचेकडून 7 ते 8 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याने सदर पुरुष व महिले विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन भाग 5 CCTNS गुरनं. 13/2023 भादवि कलम 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात खंडणी मागणारे इसम व महिला हे आज दिनांक

16/01/2023 रोजी खंडणी मागण्याकरिता येणार असल्याचे फिर्यादी यांनी कळविल्याने श्री. बालाजी ऑईल मिल एरंडोल येथे पंच व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, पोउनि शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, पोना/ मिलिंद कुमावत, पोना/ संदीप पाटील, पोना/ जुबेर खाटीक, महिला पोना/ ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांचेसह श्री. बालाजी ऑईल मिल एरंडोल येथे सापळा रचला असता दोन महिला दोन इसम हे खंडणी मागण्याकरीता ऑईल मिल मध्ये आले व एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर थांबले असता ऑईल मिल मध्ये आलेल्या महिलेने अनिल गणपती काबरे यांचेकडून 1 लाख रुपये खंडणी घेतली असता लागलीच रंगेहात छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले असता छाप्याची चाहुल लागल्याने मिलच्या बाहेर उभे असलेले एक महिला व तीन पुरुष हे दोन मोटर

सायकलवर म्हसावद नाका मार्गे जळगांवकडेस पळुन जात असतांना सपोनि गणेश अहिरे, पोना/जुबेर खाटीक, महिला पोना/ ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांनी त्यांचा पाठलाग करुन महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दुरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार यांचे मदतीने पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपीतांना त्यांचे नाव गाव बाबत विचारणा करता त्यांनी त्यांचे नाव 1 ) साक्षी राजु तायडे, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ 2) मोहीनी विनोद लोखंडे, रा. पिंपरी पुणे, ह.मु. रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ, 3) शशिकांत कैलास सोनवणे, वय- 39, धंदा- किराणा दुकान, रा. प्लॉट नं. 228, द्वारका नगर, भुसावळ, 4) सिद्धार्थ सुनिल सोनवणे, वय- 20, धंदा- शिक्षण, रा. जे.टी.एस. रोड, ताप्ती क्लब, भुसावळ, 5) रुपाली राजु तायडे, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ, 6) मिलिंद प्रकाश बोदडे, वय- 36, धंदा- पत्रकार, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा, 7) गजानन आनंदा बोदडे, वय- 32, धंदा- मजुरी, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ, 8) आकाश सुरेश बोदडे, वय- 22, धंदा- चालक, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा असे सांगुन मिलिंद प्रकाश बोदडे, वय- 36, धंदा- पत्रकार (न्युज 24 महाराष्ट्र), रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा याने यापुर्वी वेळोवेळी त्यांचे ऑईल मिल कारवाई करणे बाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करुन अनिल गणपती काबरे यांचेकडून 60000 ते 70000 हजार रुपये रोख खंडणी घेतली आहे. तसेच वरील आरोपीतांसोबत आपसात संगनमत करुन अनिल गणपती काबरे यांना श्री बालाजी ऑईल मिल बाबत तक्रार करण्यात याची धमकी दाखवुन त्यांचेकडे 7 ते 8 लाख रुपये खंडणीची मागणी करुन 1 लाख रुपये खंडणी स्विकारली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या वर नमुद इसम व महिला यांचेकडून खंडणीचे 1 लाख रुपये रोख, 8 मोबाईल, 2 मोटर सायकल, 1 डिझायर कार असा एकुण 10,04,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन नमुद आरोपीतांपैकी साक्षी राजु तायडे, मोहीनी विनोद लोखंडे यांचे वयाबाबत साशंकता वाटत असल्याने त्यांना बालसुधार गृह जळगांव येथे जमा करण्यात आलेले असुन उर्वरीत आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button