जिजामाता विद्यालयाचे 18 विद्यार्थी जिल्हास्तरावर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – क्रीडा युवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरेचे 16 मुले व दोन मुली एकूण 18 विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
त्यामध्ये 17 वर्ष वयोगट 4×100 चा रिले 1.हर्षल सोमटकर 2.करण काकडे 3.कार्तिक धनगर 4.अभिषेक आढाव 5करण प्रभू व 14 वर्षे व गटांमध्ये अभिषेक नवघरे 600 मीटर प्रथम कार्तिक कालापाड 600 मी प्रथम व 17 वर्षे वयोगटांमध्ये करण काकडे 100 प्रथम 1500 मीटर प्रथम अभिषेक आढाव १०० मीटर प्रथम तुषार बागल 3000 प्रथम हर्षल सोमटकर 3000 द्वितीय व 19 वर्षे वयोगटां मध्ये संतोष कालापाड ,गोळा फेक प्रथम शिवाजी मुठाळ 400 प्रथम व 3000 प्रथम करण गवळी 800 मीटर द्वितीय मोहन कुठे 5000 चालणे प्रथम ओंकार खिल्लारे 3000 मीटर द्वितीय व सानिका कालापाड 3000 मीटर प्रथम 1500 मीटर प्रथम गोळा फेक प्रथम व क्रॉस कंट्री प्रथम केलं 17 वर्षे वयोगट नेहा कालापाड 1500 मीटर प्रथम व 3000 मीटर प्रथम व निखिल काकडे थालीफेक प्रथम आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष तथा माजी आमदार विजय जाधव,सचिव रंगनाथ पांडे,उपाध्यक्ष सुनील जाधव,संचालक राम जाधव,अंजिक्य जाधव यांनी अभिनंदन केले आहे. या क्रीडाविभागाचे नेतृत्व क्रीडाशिक्षक विलास खराटे यांनी केले या सर्व विजयी खेळाडूंचे प्राचार्य राधेश्याम घुगे,नवनाथ मुठाळ, प्रा.गोकुळ राठोड,प्रा.संतोष वाझुळकर, प्रा.पंकज ईश्वरे,परमेश्वर वाळूकर, गणेश वाझुळकर, रामेश्वर मानवतकर, गणेश बाजड,गणेश भरडे,रवी जंजाळकर,उमेश लहाने,वैशाली धंदरे,अनंत जहागीरदार,संदीप देशमुख, बळीराम नवघरे ,मोहन शिरसाट सर्व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.



