Uncategorized

एक गाव- एक देवी, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न-सरपंच जांब (अढाव)

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – जांब अढाव गावातील नवरात्र उत्सव म्हणजे एक आदर्श निर्माण करणारा आहे, ज्या गावात ‘एक गाव, एक नवदुर्गा देवी’ ही संकल्पना वर्षानुवर्षे यशस्वीपणे राबवली जात आहे. इतर गावांमध्ये अनेक दुर्गा मंडळे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करतात, पण जांब ता.रिसोड(अढाव) येथे संपूर्ण गाव एकत्र येऊन एकच दुर्गेची मुर्ती मंदिरात आहे त्यामुळे इतरत्र मुर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही.हे अनोखे वैशिष्ट्य गावाच्या एकजुटीचे आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे.गावात नवरात्र उत्सवात घटस्थापना होते आणि अखंड ज्योत लावली जाते. संपूर्ण गावात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी आणि सामूहिक आयोजन यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो. ‘एक गाव, एक देवी’ या संकल्पनेमुळे गावात धर्मभावनेसोबतच सामाजिक एकोपाही दृढ होतो. गावातील नागरिक एकत्र येऊन उत्सवाची तयारी करतात, विविध कार्यात सहभाग घेतात आणि संपूर्ण उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.या उपक्रमाची प्रेरणा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘एक गाव, एक दुर्गा’ या योजनेतून आली आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि लोकांमध्ये सांस्कृतिक जागृती घडवून आणणे आहे. या योजनेअंतर्गत दुर्गादेवीच्या मंदिरे बांधून तिची पूजा-अर्चा केली जाते, ज्यामुळे ग्रामीण भागातील एकात्मता आणि सामाजिक जागरूकता वाढीस लागते.
या संकल्पनेचा यशस्वीपणे विस्तार आणि ग्रामीण भागात जनजागृती करण्यामध्ये जांब अढावचे सरपंच, श्री. सुधाकर तुळशीरामजी अढाव यांचे योगदान मोठे आहे. सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासात मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वात गावात अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे पार पडली आहेत, ज्यात रस्त्यांची सुधारणा, पाणीपुरवठा व्यवस्था उभारणे, आणि शाळांसाठी सुविधा वाढवणे या गोष्टींचा समावेश आहे. विशेषतः, त्यांनी नवरात्र उत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे उत्सवाच्या वेळी गावकऱ्यांना कुठलीही अडचण येत नाही.
सरपंचांनी गावाच्या विकासासाठी अनेक काम केले आहे.शुद्ध पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे पाण्याची समस्या सोडवली आहे. तसेच, त्यांनी वृक्षारोपण मोहिमेद्वारे गावात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. गावात स्वच्छता आणि आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवले जात आहेत, ग्रामस्थांचे आरोग्यही सुधारले आहे.
सरपंच यांच्या नेतृत्वाखाली गावात सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश पसरवणारा हा नवरात्र उत्सव आजही गावाच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एक गाव, एक देवी’ ही संकल्पना यशस्वी झाली आहे, आणि त्याचा सकारात्मक परिणाम गावाच्या विकासावर दिसून येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button