Uncategorized

धनलक्ष्मी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ठेवींच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. ३०: बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. 710/2026 अन्वये धनलक्ष्मी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणा येथील ठेवीदारांच्या ठेवींच्या अपहारासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्याकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह MPID Act 1999 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणातील पतसंस्थेचे कार्यालय बुलढाणा शहरातील र.नं. 393, सर्क्युलर रोड, चिंचोले चौक, बाहेकर कॉम्प्लेक्स येथे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ठेवीदारांनी ठेवलेल्या रक्कमेबाबत अपहार झाल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पतसंस्थेत ज्यांच्या पैशांच्या ठेवी असतील, त्यांनी संबंधित ठेवीच्या पावत्या घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे स्वतः हजर राहून नोंद करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठेवीदारांनी आपल्याकडील ठेवीच्या पावत्या व संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. रोकडे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button