Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री गजानन महाराज संस्थानकडून १ कोटी ११ लाखांचा निधी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ११ लाख रुपयांचा सहयोग निधी देण्यात आला.

संस्थानच्या वतीने हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २७ सप्टेंबर २०२६ रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती संस्थानने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटद्वारे दिली आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हा सहयोग निधी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button