बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अशोक सिंघल शताब्दी वर्षानिमित्त सोनबर्डीत आदिवासी महिलांचा सन्मान. बिरसा मुंडा यांचे विचाराचे प्रबोधन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दी.1/10/2026.
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या सोनबर्डी गावामध्ये विश्व हिंद परिषद व बजरंग दल यांच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रद्धेय अशोक जी सिंघल यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि संघटनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा प्रसंगी खामगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश जी झापडे यांनी उपस्थितांना मोलाचे संघटनाविषयक मार्गदर्शन केले. तसेच संस्कृत जिल्हाप्रमुख हरी भक्त पारायण गणेश महाराज बावस्कर यांना उपस्थित आदिवासी बांधवांना महान क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. याच सोबत राजेश जी राजपूत यांना संत रविदास महाराज यांच्या विचारावर प्रकाश टाकत उपस्थितांचे प्रबोधन केले.

महिलांना साडी वाटप आणि सामाजिक उपक्रम.
श्रद्धेय अशोक जी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे साधून सोनबर्डी गावातील सर्व आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती.
या भव्य कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गोपाल बोपले. गोपाल सातव. जिल्हा संयोजिका कल्पना चांडक. भारत बावस्कर. भीमाशंकर कातव. अविनाश बोपले. सचिन बावने. श्रीकृष्ण घायळ. दत्ता इलामे. आणि सागर वावरे या मान्यवरासह संग्रामपूर तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button