Uncategorized

सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचे अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचे आवाहन!सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, उप अधीक्षकांनी हिवरखेड येथे भेट देऊन केली चर्चा.

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड दि.03/ऑक्टोंबर |
आगामी दिवसात महत्वपूर्ण सण – उत्सवांचा भरगच्च कार्यक्रम असून त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) बच्चन सिंग तसेच अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) अनमोल मित्तल यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे भेट देऊन महत्त्वपूर्ण विषयांवर संबंधितांशी चर्चा केली.

पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी हिवरखेड येथे आले असता हिवरखेड चे ठाणेदार श्री. गजाननजी राठोड, संपूर्ण पोलीस स्टाफ, अनेक पोलीस पाटील, अनेक शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव व व्यापारी बांधवांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मंडळी उपस्थित होते. सर्वांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा यथोचित स्वागत सत्कार केला.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थित मान्यवरांशी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यासह महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. पोलीस अधीक्षकांनी सर्वांकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून उपस्थित सर्वांकडून आपापले अभिप्राय व मते जाणून घेतली. सोबतच त्यांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचे आवाहन युवकांना केले. कोणत्याही समाजाने आपले सण उत्सव साजरे करताना इतर समाजातील अथवा धर्मातील कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, गावात मुख्य ठिकाणी आवश्यक असलेली सी.सी.टी.व्ही यंत्रणा, मध्य प्रदेश सीमेपूर्वी मेळघाट च्या सीमेवर वन विभागाप्रमाणे पोलीस विभागाचा चेक पोस्ट पोलीस चौकी उभारणे, हिवरखेड पोलीस स्टेशनची इमारत आणि पोलिसांची शासकीय घरे अत्यंत जीर्ण झाली असून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी उत्तम दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची उपस्थितांनी मागणी केली. यावेळी माजी सरपंच सुरेश ओंकारे, सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, पत्रकार सुरज चौबे, केशवराव कोरडे, गोवर्धन गावंडे, शाहरुख लाला, शेख जमीर, पंकज अग्रवाल, पावन बजाज, राजेंद्र चणेकर, डॉ. प्रशांत इंगळे, मोहम्मद यासीन, मोईज जमादार, शांताराम कवळकार, सतीश इंगळे, राजू खान, हिफाजत भाई, यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button