बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

स्वातंत्र्य दिनी ” देश की रक्षा हम करेंगे ” या कमांडो विद्यार्थिनींच्या जयघोषाने नागरिकांमध्ये संचारली राष्ट्रप्रेमाची भावना

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

मंगरूळ नवघरे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिल्हा परिषद हायस्कूल जुनिअर कॉलेज मंगरूळ नवघरे येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ . रामेश्वर सुधाकरराव धमक यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सरपंच सौ . नलिनीताई जाधव , शाळा समिती उपाध्यक्ष शांतीराम शेजोळ , सदस्य अनिल आंभोरे , शेरुभाई तसेच पालक व गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून वंदेमातरम , राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली .

 याप्रसंगी देशभक्तीपर  गीतांवर बसविण्यात आलेली सामुहिक कवायत , विद्यार्थिनींची कमांडो फोर्स , स्वातंत्र्य सेनानी स्कीट , लेझीम नृत्य , चित्तथरारक योगासन करून दोन हातांवर चालणे ,  कोलांटउड्या , लाठीकाठी  अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी नागरींकांचे लक्ष वेधले आणि मुलींच्या कमांडो फोर्सने दिलेला नारा

” देश की रक्षा हम करेंगे , हम करेंगे या बुलंद जयघोषाने नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये अक्षरशः राष्ट्रभावना ,त्याग , समर्पण व जाज्वल्य देशप्रेम संचारले आणि संपूर्ण गावात देशभक्ती , एकता व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले .

यावेळी प्राचार्य वसंतराव गाडेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना व युवकांना उद्येशून लिहिलेले पत्र सर्वांना वाचून दाखविले व उपस्थित सर्व विद्यार्थी , शिक्षक , पालक व नागरीकांना व्यसनमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी व्यसनमुक्ती बाबतची शपथ देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून बक्षिस देण्यात आले .

  कार्यक्रमाचे प्रास्ताविकात  आदर्श शिक्षक रामनंदन केदार यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाप्रती आपली कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक डी . एस . वायाळ तर आभार प्रदर्शन पंढरी रिंढे यांनी केले .

   देशभक्तीमय वातावरण निर्मितीसाठी शाळेतील उपक्रमशिल शिक्षक रामनंदन केदार , कु . सुनयना नेवारे मॅडम , राजेंद्र चव्हाण , रामेश्वर तोंडे , पंढरी रिंढे , कु . कल्पना जाधव , कु . निलाक्षी भालेराव , ज्येष्ठ शिक्षक डी . एस . वायाळ , परमेश्वर सुर्वे ,  संतोष मोरे , संजय इंगळे , तुषार कुसुंबे  इरफान पटेल व कु . कविता उंबरकर या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व नागरीकांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button