Uncategorized

श्री गणेश विद्यामंदिर व माय मदर इंग्लिश स्कुल व कला वाणिज्य महाविद्यालय मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न…

दिवा – (सचिन शेलवले ) दिनांक 15/8/2026 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री . गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा, माय मदर इंग्लिश स्कुल, लिलावती कला वाणिज्य महाविद्यालय मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला . या कार्यक्रमाला संस्थेचे सन्मानिय अध्यक्षा श्रीमती लिलावती लक्ष्मण म्हात्रे तसेच संस्थेचे पदाधिकारी शिवदत्त म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, सौ . केतकी म्हात्रे, सौ .गिता म्हात्रे तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल भोईर व माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . प्रथमता विद्यार्थ्यांनी भरपावसात लेझीम व ढोलकीच्या तालावर प्रभातफेरी काढली . त्यानंतर शाळेच्या मैदानात सर्वांच्या उपस्थितित अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . त्यानंतर श्री . गणेश विद्यामंदिर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच बाल जिजाऊ संस्कार केंद्र व माय मदर इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन निमित्त भाषणे, समुहगीते, नृत्य तसेच बासरी वादन इत्यादी कलाकृती सुंदर रीत्या सादर केल्या . त्यानंतर इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेमध्ये मध्ये प्रथम, व्दितिय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले . व विद्यार्थ्यांच्या पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले . त्यानंतर संस्थेतर्फे यावर्षी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व पुष्पगुच्छ माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी सर यांना तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार शैला महाजन ह्यांना तसेच कला, क्रिडा, संगीतवादन व नृत्य कलेत सर्व गुणसंपन्न असलेले अष्टपैलु असलेले आमचे दिवंगत कै . इंद्रजित रामदास करटुले यांना मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती रोशनी करटूले ह्यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवार सर आणि समारोप रविंद्र मोंडुळे यांनी केले . कार्यक्रम यरास्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी व संगीत प्रेमी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली . त्यांचे सुद्धा विशेष आभार माणून कार्यक्रम यरास्वीपणे संपन्न झाला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button