Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाणे दौरा ;शहरातील वाहतुकीमध्ये बदल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि 03/10/2024 घोडबंदर रोड भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ऑक्टोबर राजी दौरा आयोजित केला आहे. त्यानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केला असून काही मार्गांवर वन वे वाहतूक केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गुरुवारी दिली. कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे.या कार्यक्रमास महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे ते घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता, डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाक्यापर्यंत वाहने उभी पार्क करण्यास मनाई असून हा मार्ग एक दिशा मार्ग (वन वे) केला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, ती सुरळीत राहण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी शहरातील वाहतूकीमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. 🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button