Uncategorizedमहाराष्ट्रविदर्भ

सिनगाव जहागीर फाटा ते खल्याळ गव्हाण रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा; सामाजिक कार्यकर्ते योगेश मिसाळ यांचे PWD ला निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:रा. सिनगाव जहागीर फाटा ते खल्याळ गव्हाण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना रोज नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य करावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश बाबासाहेब मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात मिसाळ यांनी म्हटले आहे की, या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले असून, भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे PWD च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रखडलेले खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button