माळेगाव बाजार येथील शीतलेश्वर कावळ यात्रा उत्सवात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी तेल्हारा
माळेगाव बाजार येथील
शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग यंदा एकत्र आल्याने माळेगाव बाजार येथील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 30 वर्षांनंतर आलेल्या या योगानिमित्त माळेगाव नगरी मध्ये शिवभक्तांनी श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा जागर केला.
शिवभक्तांची गेल्या काही वर्षा पासून सुरू असलेली धार्मिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. शिवभक्तांकडून ४० किलोमीटर पायी प्रवास करून महाकालेश्वर आणि शीतलेश्वर यांना जलाभिषेक करण्याची परंपरा कायम आहे. या भक्तिमय परंपरेला वंदन करण्या साठी गावातील तब्बल ५ शिवभक्त मंडळांना भेटी दिल्या. यावेळी विविध मंडळांमध्ये महाआरती करण्यात आली. गावातील शिवभक्तांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच श्रावणातील सेवा, भक्ती आणि धार्मिक परंपरा जपणाऱ्या भक्तांचे स्वागत करून त्यांचे कौतुक केले.



