खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने प्रयत्न करा : STI कांचन महाजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

सरदार जी. जी. विद्यालयात माजी विद्यार्थिनीचा गौरव समारंभ; ‘वर्ग एक अधिकारी होण्याचे’ कांचनचे ध्येय

रावेर, दि. १७ ऑगस्ट २०२६ : रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी. जी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु. कांचन जयंत महाजन हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब परीक्षेत यशस्वी निवड होऊन स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर (STI) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयात तिचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.

कु. कांचन महाजन हिने सन २०१७ ते २०१९ या शैक्षणिक कालावधीत सरदार जी. जी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. त्यापूर्वीचे माध्यमिक शिक्षण तिने सौ. के. एस. ए. गर्ल्स हायस्कूल, रावेर येथे पूर्ण केले.

या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरदार जी. जी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. महाजन होते. यावेळी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन मा. श्री. संतोषशेठ अग्रवाल, अध्यक्ष देवेंद्र मिसर उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले संचालक मा. श्री. तुषार मानकर, उपमुख्याध्यापक श्री. एन. जे. पाटील, उपप्राचार्य श्री. शैलेश राणे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. के. ए. नाईक, सौ. आर. बी. सरोदे, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कु. कांचन महाजन हिचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना कु. कांचन महाजन हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आपले उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवा. कामात सातत्य महत्त्वाचे आहे. सतत प्रयत्न करीत राहा. अपयश आले तरी नाराज होऊ नका. आपल्या शाळेतच आपल्या यशाचा पाया मजबूत करा. यापुढे आणखी अभ्यास करून वर्ग एक अधिकारी होण्याचे माझे ध्येय आहे,” असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला.

मुख्याध्यापक श्री. बी. आर. महाजन यांनी विद्यालयाच्या वतीने कु. कांचन महाजन हिचे हार्दिक अभिनंदन करून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थिनीने मिळविलेले हे यश विद्यालयासाठी अभिमानास्पद असून, तिच्या यशातून विद्यमान विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. आर. आर. उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक श्री. व्ही. व्ही. पाटील यांनी केले.

कु. कांचन जयंत महाजन हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघ तसेच सरदार जी. जी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button