योगमाया प्रतिष्ठानच्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

मुक्ताईनगर | योगमाया
प्रतिष्ठान, मुक्ताईनगर यांच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य निबंध लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन संत मुक्ताबाई महाविद्यालयात करण्यात आले. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार गिरीश वखारे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. योगमाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अश्विन सुरवाडे यांनी प्रास्ताविक करताना “शिव विचारांचा करूया जागर” या ब्रीदवाक्यांतर्गत वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी काही निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी तहसीलदार गिरीश वखारे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, विचार आणि संघर्ष यांची माहिती देत त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.या वेळी विविध गटांतील एकूण ३५ विजेत्यांना तहसीलदार गिरीश वखारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील, प्रा. शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गट, ग्रामीण व शहरी शालेय गट तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद शाळा गटात परी प्रमोद पाटील यांनी प्रथम, देवयानी मुकुंदा लोहार यांनी द्वितीय तर पायल विनोद जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ग्रामीण शालेय गट (पाचवी ते आठवी) मध्ये कार्तिक कोळी प्रथम, प्रणाली घोगरे द्वितीय आणि केतकी कोळी तृतीय ठरले. ग्रामीण शालेय गट (नववी ते बारावी) मध्ये प्रियंका जाधव प्रथम, पूर्वजा गवळी द्वितीय आणि सृष्टी गायकवाड तृतीय ठरल्या.शहरी शालेय गट (पाचवी ते सातवी) मध्ये समर्थ धनगर प्रथम, इशिता महाजन द्वितीय व श्रुती वाघ तृतीय ठरल्या. शहरी शालेय गट (सातवी-आठवी) मध्ये दिव्यांशी पाटील प्रथम, स्वाती गावंडे द्वितीय व आदित्य कोळी तृतीय ठरले. शहरी शालेय गट (नववी ते बारावी) मध्ये शर्वरी केतन पाटील प्रथम, रुद्र वरणकार द्वितीय व सारिका बेलदार तृतीय ठरल्या.वरिष्ठ महाविद्यालयीन गट (UG ते PG) मध्ये सानिका सोनार यांनी प्रथम, मानस वळवी यांनी द्वितीय तर शुभांगी सावळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेत एकूण ४०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवीण राठोड यांनी केले तर वंदे मातरम्ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगमाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन सुरवाडे, संकेत कपले, मयूर पाटील, सनत जैन, प्रवीण राठोड, मनीष महाजन, तेजस सापधरे, वैभव इंगळे, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख, अनिल गवते आदींनी विशेष परिश्रम घेतले.



