जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गॅस दरवाढीविरोधात उद्या काँग्रेसचे ब्लॉक स्तरावर जिल्हाभर आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांचे सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा  : मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक ६० रुपये अशी वाढ करून सर्वसामान्य जनतेकडून पठाणी लूट सुरु केली आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने आजवर किमान ५० वेळा गॅस सिंलेडरच्या दरात वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात ४०० रूपयांवर असलेला गॅस सिलेंडर आता ९०० रूपयांवर पोहोचला आहे.

तसेच व्यावसायिक सिलेंडरही गेल्या आठवडाभरात १५० रूपयांनी महाग झाल्याने त्याची किंमतही १ हजार ९०० च्या जवळपास पोहोचली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, १२ मार्च रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका, ब्लॉक तसेच गावपातळीवर हे आंदोलन होणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी, व्यावसायिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना गॅस दरवाढीचा मोठा फटका बसत असून महिलांचे घरगुती बजेट कोलमडले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सिंलेडरसाठी रांगा लागत असून हॉटेल, रेस्टॉरंट मालकही हैराण झाले आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात अचानक वाढ करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या तालुका, ब्लॉक व गावपातळीवर आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button