रोजगार हमी योजनेतील गोंधळ थांबवा, अन्यथा स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरणार ! प्रशांत डिक्कर….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
तेल्हारा दि. ११ मार्च २०२६
तालुक्यातील ‘रोजगार हमी योजना – फळबाग लागवड’ अंतर्गत होणारी कामे वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला यांना निवेदन देऊन आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शासकीय ऑनलाइन पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने आणि तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे फळबाग अनुदान रखडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रामुख्याने केळी, संत्रा आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. मरेगा (MGNREGA) कामाचा ब्लू-प्रिंट आराखडा आणि सविस्तर अंदाजपत्रक वेळेत मिळत नाही, तसेच डेटा फ्रीज करण्याच्या कामात ऑपरेटरकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप डिक्कर यांनी केला आहे.
कृषी विभागासाठी स्वतंत्र डेटा ऑपरेटरची नियुक्ती करावी,कामापूर्वीचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचे अधिकार स्वतंत्रपणे कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना द्यावेत,अकुशल कामाचे मस्टर काढताना येणाऱ्या अडचणी दूर करून ते ग्रामपंचायत स्तरावरच निर्गमित व्हावे,पावसाची अनिश्चितता आणि वाढता खर्च पाहता, सर्व पात्र फळबाग धारकांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरित मिळावे,प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आणि कामात सकारात्मक बदल न झाल्यास आगामी काळात स्वराज्य पक्षाच्या वतीने ‘लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला असून आता प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे….✍️



