ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त दहीगावात राबविण्यात आले ‘रक्तदान’ शिवसंकल्प अभियान! २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
दहिगाव अवताडे दि.११ ; वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा काल दि.१० मे रोजी ७० वा वाढदिवस होता. त्यानिमित्त दहिगाव अवताडे येथे ‘रक्तदानाचा शिवसंकल्प अभियान’ राबविण्यात आले. हे अभियान निव्वळ एक अभियान नसून ते एक महान राष्ट्रीय कार्य आहे, या राष्ट्रीय कार्यात तब्बल २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून कार्यकर्त्यांच्या वतीने हा दिवस दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘स्वाभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर हे एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते बाळासाहेब आंबेडकर या नावाने लोकप्रिय आहेत ते भा.रि.प. बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदेचे सदस्य राहिलेले आहेत.
तेल्हारा तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी दि.१० मे रोजी हा कार्यक्रम राबवून २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जगाला एक नवीन संदेश दिला व बाळासाहेब आंबेडकर यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन एक नवा आदर्श जगासमोर मांडला.
यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी ‘रक्तदानाचा शिवसंकल्प अभियान’ चे प्रमुख विकास पवार, यांच्या सह या कार्यक्रमाला रोशन गवई, अजय सरदार शिवाजी तायडे, धर्मेंद्र पांडवकर, आनंद इंगळे, विशाल गवई, संदीप जुंबळे, शरद सरदार, प्रवीण पोहरकर, पवन सोनटक्के, योगेश गोठाकडे विशाल तायडे , पवन सोनटक्के, संजय ठाकरे आदींची मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होती. ✍️
आता उन्हाळा चालू असून अकोल्यातील GMC, लेडी होर्डिंग सह चार प्रायव्हेट रक्तपेढी मध्ये रक्ताचा खूप मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. आज दि ११ मे ला सकाळी पासून आपल्या शिवसंकल्प च्या माध्यमातून ४ पेशंट ला ७ बॉटल रक्त ऍडजस्ट केले पण ते ऍडजस्ट करताना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात येत असते तरी आपणाकडून शक्य झाल्यास रक्तदान करावे असे कळकळीची आवाहन रक्तदान शिवसंकल्प अभियानाचे प्रमुख विकास पवार यांनी केले आहे
तसेच इच्छुकांना आपल्या परिसरात जर हे अभियान राबवायचे असेल तर त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. आपन जर आता रक्त देऊ इच्छिता तर आपण एक कॅम्प शहरात संध्याकाळी सुद्धा ऍडजस्ट करू शकतो आपला अभिप्राय नक्की कळवा.



