Uncategorized

भेंडवळच्या भाकितेलाही आचारसंहितेचे बंधन निवडणुकीचे दोन टप्पे बाकी असल्याने बाकी तानवर निर्बंध!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

जळगाव जामोद: राज्यात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे राहिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ मांडणीच्या भाकितांवर बंधन आली आहेत. आचारसंहिता लागू असल्याने दोन जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
निवडणूक पाच टप्प्यात होत आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल ला, दुसरा टप्पा 26 एप्रिल ला, तिसरा टप्पा 7 मे रोजी, चौथा टप्पा 13 मे रोजी आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणी उत्सुकाचे ठरणार आहे. असले तरी दरवर्षी देशाचा राजा आणि राजकारणाबाबत जाहीर होणारी भेंडवळच्या भविष्यवाणी मध्ये यावेळेस राजकीय भविष्यवाणी जाहीर होणार आहे. हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
370 वर्षाचा इतिहास
370 वर्षाचा इतिहास असलेली भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी केली जाणार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे हंगामाच्या दृष्टीने पीक, पाणी , सामाजिक ,आर्थिक ,राजकीय परिस्थिती बाबत या गट मांडणी द्वारे अंदाज व्यक्त केले जातात. ही मांडणी पाण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शेतकरी येत असतात. भेंडवळला लागू असलेल्या शेतात एका गोल घटात मांडणी केली जाते. त्यानंतर शनिवारी सूर्योदयाच्या वेळी मांडणीची पाहणी करून चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ भाकीत जाहीर करतील. आचारसंहिंतीमुळे बंधने
यंदाच्या मांडणी राजकीय भाकिते दर्शविले जाणार नाही. त्यांचे कारण म्हणजे देशात असलेली आचारसंहिता. भेंडवळच्या बाकीचे मध्ये राजा कायम आहे की नाही, देशाची आर्थिक स्थिती कशी राहील? देशाच्या राजावरील ताण राहणार आहे का? शिवाय परकीयांची घुसखोरी बाबत भविष्यवाणी केली जाते. मात्र, या सर्व बाबी यावेळेस एका वयास मिळणार नाही. आचारसहिता सुरू आहे. निवडणुकांपूर्वी राजकारणाबाबत सांगणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लेखन असल्याने पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ याबाबत वक्तव्य करणार नसल्याचे समजले.
2 जूनला जाहीर करणार राजकीय भाकीत? लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. 1 जून पूर्वी निवडणुकीच्या परिणामावर कुठलेही प्रभाव पडणाऱ्या विषयांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सारंगधर महाराज वाघ हे राजकीय विषयांचे भाकित 2 जून रोजी जाहीर करणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे. ✍

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button