खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

संविधानाचा गौरव करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिकता : जयसिंग वाघजळगाव

संविधानाचा गौरव करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिकता : जयसिंग वाघजळगाव :- आज जगभरात एक लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून जे स्थान मिळाले आहे ते केवळ आपल्या संविधाना मुळेच , संविधानाने मानवी मूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकास प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे म्हणून संविधानाचा गौरव करणे , तिची कोणी अवहेलना करत असेल तर त्याला वेळीच प्रत्युत्तर देणे , तिला कोणी धोका पोहचावीत असेल तर तिच्या सुरक्षितते करिता रस्त्यावर उतरणे हे देशातील विशिष्ट समूहाचे कर्तव्य नाही तर समस्त भारतीयांची नैतिकता आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. जळगाव येथील प्राईम पब्लिकेशन च्या मुख्य सभागृहात धुळे येथील भटू अंबर मंगळे लिखित ‘ संविधान गौरव ‘ या पुस्तकाचे विमोचन करतांना वाघ बोलत होते. जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , आज संविधान हा विषय राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जास्त आहे , देशभरातून विविध लेखक या विषयावर पुस्तकं लिहीत आहेत , विविध कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून सोप्या भाषेत प्रयोग सादर करीत आहेत , सर्वसामान्य जनता संविधान वाचण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे ही समाधानाची बाब जरूर आहे पण संविधानाचा धोका मात्र कमी झाल्याचे दिसत नाही हे सत्य नाकारता येणार नाही . अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते , त्यांनी सांगितले की , भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा असून त्या आधारे देशाचा सर्व कारभार चालत असतो . संविधानावर जनजागृती करणे आज काळाची गरज बनली आहे . प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी संविधानाच्या निर्मितीचा इतिहास सांगून हा इतिहास सुध्दा पुस्तकरूपाने समोर येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा पाटील , सूत्रसंचालन प्रदीप पाटील , आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश वानखेडे , परिचय सोमा भालेराव , स्वागत गौतम वाकोडे , अरुण जोशी यांनी केले . लेखक भटू मंगळे यांनी पुस्तक लिहिण्या मागील भूमिका विषद केली .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button