शिक्षक दिनानिमित्त हिवरखेडला भव्य वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन

शिक्षक दिनानिमित्त हिवरखेडला भव्य वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन
हिवरखेड (वार्ताहर )
पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त हिवरखेडचे माजी उपसरपंच रमेश दुतोंडे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुलभाताई रमेश दुतोंडे यांनी शिक्षक आणि शिक्षकांच्या कुटुंबासाठी भव्य अशा वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनात भन्नाट हास्य कवी प्रा. संजय कावरे व एबीपी माझा फेम सुप्रसिद्ध हास्य कवी नितीन वरणकार सर हास्याचा दरबार भरवणार आहेत तर त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध निवेदक व गझलकार गोपाल मापारी हे आपल्या निवेदनातून रसिकांना हसून हसून लोटपोट करणार आहेत. या हास्य कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते वासुदेव निंबोकार असून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते या हास्यकवी संमेलनाचे उदघाट्न होणार आहे. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येईल तसेच भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे. शिक्षकांवरील कामाचा वाढता बोजा व ताणतणाव या मुळे शिक्षकांमध्ये वैफल्य निर्माण होत आहे. या शिक्षकांना निदान एक दिवस तरी सहकुटुंब मनमोकळे हसता यावे यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया रमेश दुतोंडे यांनी दिली.तरी तरी पाच सप्टेंबरला विघ्नहर्ता मंगल कार्यालय हिवरखेड येथे संध्याकाळी ठीक पाच वाजता आयोजित या वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाला सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महेंद्र कराळे व किरण सेदानी यांनी केले आहे.



