शेगाव येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगरहून पायी दिंडी; हरिनामात भक्तीमय उत्सव


मुक्ताईनगर (प्र.क्र.१२, शिवरायनगर), :
आदिशक्ती श्री.संत मुक्ताई महिला भजनी मंडळ,मुक्ताईनगर संचलित, जय हनुमान भजनी मंडळाच्या वतीने शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शेगाव येथे पायी दिंडी व पालखी सोहळा पार पडला. हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि सुश्राव्य अभंगांच्या गायनाने हा सोहळा अतिशय भक्तिपूर्वक साजरा करण्यात आला.
या पायी दिंडीमध्ये मंडळाच्या अध्यक्षा तथा कथावाचक कीर्तनकार सौ. दुर्गा संतोष मराठे, कीर्तनकार सौ. राजकन्या रमेश जोगी, सुरेश भोलाणे, रमेश पाटील, संतोष मिस्तरी, गोपाळ चौधरी, गायनाचार्य रतिराम महाराज, गायनाचार्य रमेश पाटील महाराज, मृदंगाचार्य प्रणव पाटील, तसेच सिंधूबाई संतोष मिस्तरी, ज्योती रमेश पाटील, लता रमेश माळी, विमल सुभाष सोनार, संगीता प्रवीण कदम, मालतीबाई मदन लिहेकर, बेबीबाई माळी, मानस बाविस्कर, इंदूबाई सुरेश भोलाणे, कृष्णा मराठे यांच्यासह मंडळातील असंख्य भक्त सहभागी झाले होते.
ही दिंडी फक्त धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, समाजजागृतीचा जिवंत संदेश घेऊन चाललेली होती. मंडळाने संत परंपरेचे दर्शन, सामूहिक अभंगगायन, हरिपाठ यांच्या माध्यमातून भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं.
दरम्यान, आदिशक्ती श्री.संत मुक्ताई भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, कुपोषण मुक्ती, भ्रूणहत्या प्रतिबंध, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार, गोसेवा, आणि अध्यात्मिक भजनांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक जनजागृती हे मंडळाचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे.
या मंडळाच्या कार्यामुळे धर्म आणि समाजकार्याचा सुरेख संगम निर्माण झाला असून, युवा पिढीला संतपरंपरेची ओळख करून देत मंडळ सातत्याने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.

*शुभेच्छूक:-* मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी तथा प्राचार्य व सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधू जे ई स्कूल, ज्युनिअर कॉलेज व किमान कौशल्य विभाग मुक्ताईनगर



