वंचित बहुजन आघाडी नुतन चोपडा तालुका व शहर कार्यकारिणी तयार करण्याकरिता महत्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडी नुतन चोपडा तालुका व शहर कार्यकारिणी तयार करण्याकरिता महत्वपूर्ण बैठक
चोपडा :- दि. 6 / 07 /2023 रोज गुरुवार रोजी दुपारी १२:००वाजता स्थळ शासकीय विश्राम गृह चोपडा येथे आयोजित करण्यात आलेली आहे बैठकिच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा. विनोद सोनवणे असतील बैठकीचे विषय १) नुतन चोपडा तालुका व शहर कार्यकारिणी तयार करणे २) चोपडा तालुक्यातील आढावा घेण्यात येईल आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार ३)गाव तेथे शाखेचे आयोजन व पक्ष बांधनी संबंधित चर्चा करण्यात येणार ४) निष्क्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पदमुक्त करुण युवा क्रियाशिल कार्यकर्त्यांना नियुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात येणार५) चोपडा तालुक्यात टप्प्याटप्प्याने सभासद नोंदणी अभियान राबविणे ६) नविन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व आयत्या वेळेस आलेल्या विषयावर चर्चा करण्यात येणार बैठकिचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा प्रभारी रविकांत वाघ,जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे हे असतील तरी बैठकिस
सर्व तालुका, शहर, ग्रामशाखा, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे बैठकीत झालेल्या निर्णयावर नंतर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही तरी सर्वांनी तालुका जनरल बॉडी व सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक व समर्थक सर्वांनी या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून पक्ष वाढीस व चळवळ सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, ही विनंती बैठकिस उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले



