पेरणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर कुऱ्हाड व काठीने मारहाण केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील खातखेड शिवरातील गट क्रमांक ११ मध्ये शेतात पेरणीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यावर कुऱ्हाड व काठीने हल्ला केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेगाव । तालुक्यातील खातखेड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंदा वासुदेव उन्हाळे (४२) हे शेतात जात असताना आरोपी अरुण मुरलीधर उन्हाळे व त्यांचा मुलगा महेश उन्हाळे हे कुन्हाड व काठी
घेऊन त्यांच्याकडे आले. संशयावरून अरुण याने फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर कुन्हाडीने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. तसेच महेश याने काठीने फिर्यादीच्या पोटावर व डोक्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादीचे भाऊ व चुलती घटनास्थळी आल्याने त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित कलमांनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,



