बुलढाणामहाराष्ट्र

सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंतीनिमित्त चिखलीत  उद्यापासून भव्यदिव्य विविध कार्यक्रमांचे आयोजन !!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी !!!!

९ ते १४ एप्रिलदरम्यान व्याख्याने, स्पर्धा, रॅली, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

चिखली….
सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२६, चिखली यांच्या वतीने ०९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध  प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महापुरुषांनी दिलेल्या समता, बंधुता व न्यायाच्या विचारांचा प्रसार व्हावा, तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
गुरुवार, दि. ०९ एप्रिल २०२६ :
सकाळी ८.०० वाजता सम्राट अशोक या लोककल्याणकारी शासकाला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता धम्म ध्वजारोहण व सामूहिक बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७.०० वाजता लेखक, कवी व व्याख्याते नितीन सुभाष चंदनशिवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे.
शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ :
सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० या वेळेत भीमगीत कराओके स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ :
सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सायंकाळी ७.०० वाजता प्रा. डॉ. प्रतिभाताई अहिरे यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ :
सायंकाळी ७.०० वाजता प्रबोधनकार अविनाश भारती यांचे “हे व्याख्यान तुमची झोप उडवेल” या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ :
सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांचा भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा सादर होणार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button