प्रशासकीय कामकाज फक्तच अर्थपूर्ण !

अर्ध्या सिंचन विहीरींची कामे अपूर्ण !!
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : - राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी
शंभर टक्के अनुदानावर सिंचन विहिरीची योजना राबविल्या जात असताना पंचायत समिती अंतर्गत प्राप्त अर्जापैकी एकूण २०९४ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आले असताना मात्र यापैकी अर्ध्या विहिरीचे काम अद्यापही सुरूच झाले नाही अस्या संताप जनक प्रकाराने लाभार्थी वंचित राहणार आहेत.
सन २०२४ २५ साठी ही योजना मोठ्या प्रमाणात मालेगाव पंचायत समिती मध्ये राबविण्यात आली व त्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतला कमीत कमी २५ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सिंचन विहिरीसाठी अर्ज केले प्राप्त अर्जापैकी एकूण २०९४ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आले असताना मात्र यापैकी ५० टक्के विहिरीचे काम अद्यापही सुरूच झाले नाही त्यामुळे या कामासाठी प्रशासकीय कार्यवाहीची गरज आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर योजना अमलात आणली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत असताना ४ लाख रुपये चे अनुदान सिंचन विहिरीसाठी देण्यात येते तर जिल्ह्याला सिंचन विहिरीचे मोठे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे त्यात मालेगाव पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक गावाला कमीत कमी २५ विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले विहिरीच्या उद्दिष्टासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रशासनातर्फ युद्ध स्तरावर प्रयत्न करण्यात आले व त्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करून सिंचन विहिरीचे अर्ज घेण्यात आले मालेगाव तालुक्यात एकूण २०९४ सिंचन विहिरीच्या अर्ज प्राप्त झाले असताना त्यात वैयक्तिक १४१३ अर्ज तर सामूहिक ५०९ व सन २०२२ २३ चे १७२ अर्ज शेतकऱ्याचे असून त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतरही सन २०२२२३ पूर्वी तालुक्यात जवळपास १५२ सिंचन विहिरी ह्या अपूर्ण आहे तर सन २०२४ २५ च्या चालू वर्षातील प्रशासकीय मान्यतेनुसार एकूण १२७२ सिंचन विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या सिंचन विहिरीचे काम सध्या पावसाळा सुरू झाला म्हणून बंद असताना हे काम आता तातडीने सुरू होणे गरजेचे आहे तर मंजूर सिंचन विहिरी पैकी १४२४ सिंचन विहिरीचे काम हे अपूर्ण आहे टक्केवारी लक्षात घेता आतापर्यंत तालुक्यात जवळपास ६८ टक्के विहिरीचे काम हे सुरू आहे त्यामुळे उर्वरित सिंचन विहिरीचे कामे ही आता तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. नाहीतर लाभार्थी योजने पासून वंचित राहतील.
चौकट
शेतकऱ्यांनी सिंचन विहीरीचे कामे सुरु करा.
शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहीर चे काम हे तातडीने पूर्ण व्हावे यासाठी प्रशासकीय स्तरावरून आता प्रयत्न करणे गरजेचे आहे पावसाळा संपत आला आहे त्यामुळे येत्या उन्हाळ्यापूर्वी तालुक्यातील प्रशासकीय मान्यता प्राप्त
असणाऱ्या सिंचन विहिरीची कामे ही तातडीने सुरू व्हावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेला जलद व तातडीचे कार्यवाहीची गरज आहे तर शेतकऱ्यांनी सुद्धा मंजूर असलेल्या विहिरीचे कामे ही तातडीने सुरू करावे जेणेकरून उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
-एक वंचित लाभार्थी.











