प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला वाहतूक विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई

11 लाख 39 हजार 560 रुपयांचा माल जप्त
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : दिनांक 13/ 11/ 2024 रोजी गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या पथकाने राज्य महामार्ग क्रमांक 161 संकट मोचन हनुमान मंदिर जवळील पुलावर महिंद्रा सुप्रो वाहनाची तपासणी केली असता जाट गल्ली मालेगाव येथील विशाल अशोक लासकर वय 24 प्रवीण चंद्रकांत यादव वय 25 यांच्याकडून प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला एकूण किंमत 4865.60 रुपये अवैद्यमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली महिंद्र सुप्रो वाहन किंमत 5 लाख रुपये टीव्हीएस ज्युपिटर वाहन किंमत 1 लाख रुपये तसेच दोन मोबाईल किंमत 53 हजार रुपये असा एकूण 11 लाख 39 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यानंतर आरोपींच्या मते सदरील जप्त केलेला माल हे बंडू नंदलाल यादव राहणार वंदे मातरम चौक मालेगाव यांचा असल्याचे सांगण्यात आले.
बंडू नंदलाल यादव यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे,
मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल,
स.पो.नि.दिनेश शिरेकर, पोलीस स्टॉप पोलीस हेडकॉन्स्टेबल हरि कालाबाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद राठोड, स्वप्निल शेळके, गणेश बाजड, यांच्याद्वारे करण्यात आली.



