Uncategorized

नुकसान भरपाई चे पंचनामे तातडीने करा- आ. कुटे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

आसलगाव: 26 मे रोजी अचानक आलेल्या वादळामुळे आसलगाव व परिसरातील अनेक नागरिकांच्या घरावरील टीम पत्रे उडून व घरावर झाडे पडून खूप प्रमाणात नुकसान झाले त्यातच जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणारी कृउबासमधील टीनशेट वरील तीन पत्रे संपूर्ण उडून गेल्याने आत मध्ये ठेवलेले व्यापारी वर्गाचे तसेच शेतकऱ्यांचे धान्य अक्षर सा पावसाने ओले होऊन माती मोल झाले. त्यातच ज्वारी आणि मक्कांचा हंगाम असून संपूर्ण मार्केटमध्ये खुल्यावर ज्वारी आणि मक्का पडलेला असतो त्यातच उद्भवलेल्या अचानक वादळ आणि पावसाने बाहेर असलेला मार्केट यार्ड मधील मक्का आणि ज्वारी संपूर्ण ओली होऊन यामध्ये शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. मग का पडलेला असतो पावसामुळे मारलेले संपूर्ण उघड्यावरचे ढेर ओले झाले यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची नुकसान झाले त्यातच जागोजागी झाडे व विजेचे थांब पडल्यामुळे वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत
झाले आहे.
आसलगाव परिसरात व आसलगाव मध्ये आमदार कुटे यांच्या सूचनेवरून प्रशासन कामाला लागले असून पंचनामांना सुरुवात झाली आहे. जवळपास 400 ते 500 नुकसानग्रस्त भागाचे महसूल विभागामार्फत करण्यात आले व अजून सुद्धा सुरू आहेत. तसेच जिल्हाधिकारी विद्युत अभियंता उपविभागीय अधिकारी तहसीलदार सा. बां. विभाग यांच्या तातडीने सूचना देऊन नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करा अशा सूचना आमदार कुटे यांनी दिल्या आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button