भरधाव प्लसर दुचाकीची ॲटोरीक्षास जबर धडक; धडकेत ॲटो पल्टी होवून ॲटोतील पाच जण गंभीर जख्मी

प्लसर दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरुन पोबारा
मलकापुर प्रतिनिधी ( शेख निसार ) :- भरधाव प्लसर दुचाकीने ऑटोरिक्षास जबर धडक दिल्याने या धडकेत ऑटोरिक्षा पलटी होऊन ऑटोरिक्षातील पाच जण गंभीर रित्या जख्मी झाल्याची घटना बोदवड रोडवरील टाॅवर नजीक दि.23 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान घडली.
याबाबतची फिर्याद ऑटो चालक अशोक निना वराडे वय 47 रा. आळंद यांनी 24 डिसेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.फिर्यादीत नमूद केले आहे की माझ्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्रमांक MH 28 R 863 मध्ये सवारी घेऊन मी दि.23 डिसेंबर रोजी सायंकाळी घराकडे जात असताना सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 19 EH 5165 च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे अविचाराने चालवून माझ्या ॲटोरिक्षाला समोरील बाजूस जबर धडक दिल्याने ऑटोरिक्षा पलटी होऊन रोडच्या कडेला खाली पडून माझे वाहनात बसलेले प्रवासी व मी जखमी झालो. त्यावेळी मोटरसायकलचा चालक सुद्धा खाली पडला त्यावेळी तेथील जमलेल्या लोकांनी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोपान शांताराम कांडेलकर वय 47 वर्ष रा.चिखली(रणथम) ता. मुक्ताईनगर जि.जळगांव असे सांगितले, त्यावेळी त्याचे गाडीचा नंबर पहिला असता MH 19 EH 5165 असा होता, जमलेल्या काही लोकांनी ॲम्बुलन्स बोलावून आम्हांला ॲम्बुलन्स द्वारे सरकारी दवाखान्यात पोहोचविले, उपचार सुरू असताना माझे ऑटो मधील प्रवासी सुरेश शामराव अढाव यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी अकोला न्युराॅन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे, आज रोजी मी दवाखान्यात उपचार घेऊन पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट देत आहे, तरी पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 19 EH 5165 चे चालकाने त्याचे ताब्यातील मोटर सायकल वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून माझी ऑटो क्रमांक MH 28 एच R 863 ला जोरदार धडक देवून पलटी करून मला व माझे प्रवासी अलका कैलास निकम, कैलास रामधन निकम, सुरेश शामराव अढाव, शोभा जनार्दन भगत व माझी पत्नी अनिता अशोक वराडे सर्व रा. आळंद ता.मलकापूर जि. बुलढाणा यांना जखमी करण्यास व माझे ऑटोचे नुकसान करण्यास कारणीभूत झाला आहे तसेच तो घटनास्थळवून पळून गेला आहे तरी त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी फिर्याद दिली असल्याने शहर पोलिसांनी पल्सर दुचाकी चालक सोपान शांताराम कांडेलकर याचे विरुद्ध कलम 281,125(अ), 125 (ब), 134, 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मलकापूर शहर पो.उप.नि सुनिल घुसाळे करीत आहे.



