मनुस्मृतीनुसार वागणाऱ्या सरकारचा निषेध करत मनुस्मृतीचे दहन.

राहुरी – माणसामाणसातील भेदभाव निर्माण करून भेदभावाची दरी वाढवणारा मनुस्मृती नावाचा कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्याच्या सत्याग्रहामध्ये २५ डिसेंबर १९२७ साली ‘ दहन ‘ केला. आणि मोठ्या कष्टाने भेदभावाचा नायनाट करणारा जगातील सर्वश्रेष्ठ कायद्याचा ग्रंथ ‘ भारताचे संविधान ‘ १९४९ साली देशाला अर्पण केले.तरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून समता आणण्यासाठी शपथ घेतली. तो दिवस ‘ ‘पायी प्रबोधन मार्च ‘ काढून साजरा करण्यात आला.
संविधानाला विरोध करणारे आणि मनुस्मृती चे समर्थन करणारे लोक आजही आहेत. ते सत्तेत बसले आहेत. आणि सत्तेत बसून ते मनुस्मृतीप्रमाणे निर्णय घेत आहेत. पून्हा भेदभाव निर्माण करून वाढवण्याचे काम करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य, परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबना नंतर सोमनाथ सुर्यवंशी च्या हत्तेची घटना, मस्सा जोग(बीड) चे सरपंच संतोष देशमुख यांची नियोजित हत्या ई. अशा अनेक घटना या निमित्ताने सांगता येतील.
म्हणून, पुन्हा बुद्ध, महावीर, बसवण्णा, नामदेव, कबीर, तुकोंबा, फुले , बिरसा, आंबेडकर, गाडगेबाबा, अण्णाभाऊ… यांनी केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशी भूमिका पायी प्रबोधन मार्च च्या निमित्ताने सहभागी संघटनांनी घेतली.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजवाडा राहुरी येथे अभिवादन करून मार्च सुरू झाला. छत्रपती शिवाजी चौक, शनी चौक, अण्णाभाऊ साठे स्मारक, क्रंतिगुरू लहुजी स्मारक, क्रांतीबा जोतिबा फुले स्मारक पर्यंत मार्च काढून शेवट करण्यात आला. मनुस्मृती मुर्दाबाद, विषमतावादी मनुस्मृती जला दो!” समतावादी संविधान जिंदाबाद” या सह महामानवांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्, श्रमिक मुक्ती दल, विद्रोही विद्यार्थी संघटना, आदिवासी संघर्ष मंडळ,युवा फ्रेंड्स क्लब पिंपरी अवघड, भीम आर्मी विद्यार्थी संघटना , ACYG group Rahuri, जय भीम मित्र मंडळ, राहुरी, युवा रावण प्रतिष्ठान,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती देवळाली प्रवरा, बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना, लोकशाहीर आण्णाभाऊ विचार मंच देवळाली प्रवरा, एकलव्य संघटना अहमदनगर , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती प्रसादनागर राहुरी फॅक्टरी , MS ग्रुप चिंचोली, लोकसेवा फाऊंडेशन, सात्रळ इत्यादी सामजिक संघटना सामील झाल्या.
आयु. शिरीष गायकवाड, सुभाष पोटे, आयु. मधुकर विधाटे सर, अरुण साळवे, दीपक साळवे, किरण साळवे, आदित्य साळवे, महेश साळवे , कुमार भिंगारे, महेश मोरे, सतीश गायकवाड, अमजद पठाण, दादू साळवे, सचिन साळवे, प्रकाश साळवे, अजय साळवे, विशाल साळवे, हर्षद साळवे, अभिषेक पवार, ओंकार पवार, सिद्धार्थ साळवे, सनी राऊत, आर्यन गायकवाड, भैय्या कर्डक, विजय कर्डक, दुरेश ढोले, डॉ जालिंदर घिगे.



