क्राईमगुन्हेगारी

गोंडगाव येथील आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून

कजगाव.ता.भडगाव:भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत दि.४ रोजी कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन कँडलमार्च काढण्यात आले तर दि.५ रोजी कजगाव कडकडीत बंद पुकारत ग्रामपंचायत कार्यालया पासुन मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चात कजगाव सह परीसरातील मुलं मुली सह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
दि.५ रोजी कजगावात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता कजगाव ग्रामपंचायत कार्यालया पासुन मुकमोर्चा ची सुरुवात करण्यात आली नागद रोड, भडगाव चाळीसगाव मार्ग,बसस्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुकमोर्चा ची सांगता झाली प्रसंगी अनेकांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला मुकमोर्चा मध्ये कजगाव सह परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला पुरुष सहभागी झाले होते
,,::तगडा बंदोबस्त
कजगाव बंद च्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशन च्या वतीने चाळीसगाव पोलीस स्टेशन चे फौजदार आव्हाड,भडगाव पोलीस स्टेशन चे फौजदार डोमाळे सह कजगाव पोलीस मदत केंद्राचे नरेंद्र विसपुते दहा पोलीस कॉन्स्टेबल, दोन महिला पोलीस दंगा नियंत्रण पथकाचे पंधरा कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button