दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर-मंतर नीट पेपर फुटी आंदोलनामध्ये पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांना लाठीचार्ज,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी प्रशांत चव्हाण
बुलढाणा – (दि.21 जुलै) गेल्या तीन दिवसापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर -मंतर NEET ”पेपर फुटी आंदोलनामध्ये आंदोलन कर्त्यांना पोलिसांकडून जोरदार लाठी चार्ज करण्यात आला या लाठी चार्ज मध्ये दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी ,युवक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आपल्या देशामध्ये लोकशाही राहिली नसून हुकूमशाहीला सुरुवात झाली अशा प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिल्या. तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थी आणि युवकांनी आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने कडे धाव घेत दिल्ली जंतर-मंतर नीट पेपर फुटी आंदोलनामध्ये सरकारने दिल्ली पोलिसांना सामोरे करून आंदोलकावर लाठी चार्ज केला अश्रू धूराच्या कांड्या देखील फोडल्या असून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. लोकांवर झालेल्या अत्याचारा विरोधात सोशल मीडियावर (M H R) ला माहिती दिली असून हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय (UNITED NATIONS HUMAN RIGHTS ) स्तरापर्यंत पोहोचले असून या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे,



