बुलढाणाराजकीयविदर्भ

चिखली चा आज संध्याकाळी युवक काँग्रेसच्या दहीहंडीचा माहैल! विरोधी पक्षनेते विजयवडेट्टीवार राहणार उपस्थित अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख आकर्षण;

गेल्या वीस वर्षापासून सांस्कृतिक परंपरा असलेला चिखलेतील मानाचा दहीहंडी सोहळा आज, ६ सप्टेंबरच्या सायंकाळी संपन्न होणार आहे. श्री छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल बोंद्रे तसेच युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीचे यंदा सीने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख आकर्षण राहणार आहे. शिवाय राज्याचे विरोधी पक्षांचे ना. विजय वडेट्टीवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे व त्यांची संपूर्ण टीम या सोहळ्याच्या आयोजनासाठी झटत असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. आता अवघ्या चिखलीकरांना या दिमागदार सोहळ्याची प्रतीक्षा आहे. लोकशाही संरक्षणार्थ यंदाची जनसंवाद दहीहंडी असून या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चिखलीतील हा दहीहंडी सोहळा युवकांसाठी स्मृतिदायक ठरणार आहे. परिसरातील गोविंदांनी साहसी खेळ असलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले आहे. वीस वर्षाची सर्वात जुनी परंपरा असलेल्या या दहीहंडी उत्सवात ५ लक्ष रुपयांच्या बक्षिसांची लूट गोविंदा पथकांना करता येणार आहे, चिखली शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासणारा हा दहीहंडी उत्सव आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान आज होणाऱ्या दहीहंडी सोहळ्याला अलोट गर्दी उसळणार असल्याचे चिखली पोलिसांनी चूक बंदोबस्त ठेवण्याची नियोजन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button