खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग; भूमी अभिलेख विभागाचे लेखी आश्वासन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २१ जुलै २०२६
वानखेडे येथील जमीन मोजणी प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम निर्णय देण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन उपोषणस्थळी सुजीत बांगर, आशिष धुंधळे व विजय वानखडे यांची भेट.
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड (भाग-२) येथील सर्व्हे क्रमांक ५८ मधील जमीन मोजणी व फेरचौकशी प्रकरणी न्याय मिळावा, संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशांची अंमलबजावणी करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी संदीप नानाराव इंगळे व इतर शेतकऱ्यांनी २० जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख (गावगण), संग्रामपूर कार्यालयाकडून लेखी पत्र देण्यात आल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या पत्रात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्व्हे क्रमांक ५८ मधील मोजणी, नकाशे आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून तक्रारीतील प्रत्येक मुद्याचा बारकाईने विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत आवश्यक असल्याचे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले असून त्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करून निर्णय अर्जदारांना कळविण्यात येणार असल्याचे नमूद आहे. यापूर्वी संबंधित प्रकरणात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. न्यायासाठी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उपोषणस्थळी सुजित बंगार, आशीष धुंधळे आणि विजय वानखडे यांनी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवित प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता करावी, अशी मागणी केली. तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि प्रकरणाचा पारदर्शक व निष्पक्ष निकाल लागावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आता प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार पुढील तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अंतिम निर्णय देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागून आहे…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button