मोफत योजनांना ‘रेवडी’ म्हणणाऱ्या भाजपाचा चेंडूआता जनतेच्या कोर्टात.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – अखेर झाल्या एकदाच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच लागले सर्व राजकारणी कामाला. अन्य सरकारांनी मोफत दिलेल्या योजनांना भाजपा विरोध करून त्याला ‘रेवडी’ म्हणणाऱ्या भाजपकडून मात्र राज्यात दणक्यात गाजावाजा करून जाहीर केलेल्या अशा योजनेचा व राज्यातील राजकारण्यांचे चेंडू जनतेच्या कोर्टात आले आहेत. त्यामुळे जनता जनार्दन नेमके कोणाच्या पारड्यात माप टाकते हेच पहावे लागेल.विविध योजनांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आमिषांना राज्यातील जनता बळी पडणार की सुज्ञपणे मतदान करणार ?
जनतेला विविध योजनांद्वारे भुलविण्याची संधी खुद्द निवडणूक आयोगानेच महायुतीच्या महाराष्ट्रातील सरकारला दिली आणि तब्बल दोन महिने उशिरा निवडणूक जाहीर केली. हरियाना राज्याबरोबरच महाराष्ट्राच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्येक राज्यावर स्वतंत्रपणे लक्ष देण्यासाठी, प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी आणि अन्य सर्व मार्गांचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक यावेळी उशिरा होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता “बॉल इज इन युवर कोर्ट” या इंग्रजी म्हणीनुसार महाराष्ट्रातील राजकारण्यांचे चेंडू जनतेच्या कोर्टात आले आहेत. आता या चेंडूंची कशी धुलाई करायची, कोणाला भिरकावून लावायचं, कोणाला टोलवायचं, कोणाच्या चेंडूतली हवा काढायची ज्याचा निर्णय मतदारांना घ्यावा लागणार आहे.
महायुतीने विविध योजनांच्या माध्यमातून दाखवीलेला आमिषांना राज्यातील जनता बळी पडणार की सुज्ञपणे मतदान करणार ? याचा निर्णय पुढील महिन्यात निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपने लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना, मोफत गॅस तसेच विविध योजनांचे पैसे देण्याचा सपाटा चालू ठेवलेला आहे. अन्य सरकारांनी मोफत दिलेल्या योजनांना भाजपा आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोध करून त्याला ‘रेवडी’ असे म्हणून हिणवत होते. मात्र महाराष्ट्रात भाजपकडून होत असलेल्या अशा योजनांवर मात्र त्यांनी मौन बाळगन आहेत.
निवडणूक रणधुमाळीत महाविकास आघाडी किती रान उठविते यावरच बरेच काही अवलंबून असणार आहे. की मोफत योजनेच्या भरवश्यावर महायुतीतचा तारू तरून जाणार हे मतमोजणी नंतर समजणारच आहे.



