अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव शहराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम करुन साजरा करण्यात आला

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
शेगाव — वाढता वेगाने वाढदिवसाचे आकर्षण वाढलेले आहे.स्वतःचा वाढदिवस म्हटले की प्रसिद्धी फलक लावने,मोठ्या केक आणून चौकामध्ये तलवारीने किंवा आणखी एखाद्या मोठ्या साहित्याने केक कापून भाईगिरी करणे. व आपल्या शहरात नावाचा धबधबा गाजवणे आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच चौका चौकात फलके शहरांमध्ये लागलेली असतात. त्यातून आपली शक्ती प्रदर्शने दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात.परंतु असे न करतां भाजपा शेगाव शहर चे पत्रकार उमेश राजगुरे यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस जनसामान्य सोबत साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात होण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुच्छ हार चढवुन महाराजांना नमन केले व.नंतर सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले, निराधार महिलेला साळी चोळी आणि किराणा किटचे वाटप तसेच बाळापुर अकोला रोडवर असलेले श्री गजानन महाराज मतिमंद.निवासी विद्यालय येथे शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक तसेच राजकीय तसेच पत्रकार क्षेत्रातील शेगाव शहरातील मोठं नाव उमेश राजगुरे यांचआहे.मी जनसामान्यातला माणूस आहे मला समाजातील अशाच घटकांसोबत व समाजातील जनसामान्य लोकांसोबत माझा वाढदिवस व माझ्या आयुष्यातील काही क्षण घालवायचे आहेत त्यात मला आनंद होतो. असे प्रतिपादन उमेश राजगुरे यांनी केलेकार्यक्रमाला उपस्थित विजय भाऊ साटोटे, कमलाकर शेगोकार, गणेश मोरे ,भास्कराव नंदाने,अंबादासजी मेसरे, गजानन जी ढोके, राजेश जी राजगुरे, योगेश जी नळेकर, बाबुराव घट्टे, विशाल नंदाने ,मंगेश घुले, अविनाश नंदाने.राजेश सुरवाडे, सागर शिरसाट ,उमेश शिरसाठ ,दिनेश घाटोळ ,देवचंद समदूर, आतिश सुरवाडे ,ऋषिकेश देठे ,भास्करराव नंदाने, धनराज आटोळे नारायण डाबेराव इत्यादी पत्रकार मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातील व राजकीय व्यासपीठातील मंडळी उपस्थित होती.



