Uncategorized
खामगाव तालुका पोलिस पाटील संघटनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा. उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले. जीटी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)

येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्याकरिता मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांच्या वतीने विद्यमान तहसीलदार श्री. अतुल पाटोळे साहेब यांना निवेदन दिले यामध्ये प्रमुख मागण्या
1) पोलिस पाटील यांना दरमहा 18000/- रुपये मानधन देण्यात यावे.
2) पोलिस पाटील नुतनीकरण कायम स्वरुपी बंद
करण्यात यावे
3) ग्राम पोलिस पाटील अधिनियम 1967 आवश्यक बदल आणि काटेकोर अमलबजावणी 4) निवृत्ती नंतर दहा लक्ष कुटुंबाला एकरकमी रोख
रक्कम देण्यात यावी 5) राज्यपाल पुरस्काराची रककम वाढविण्यात यावी. इतर मागण्यासह स्थानिक खामगाव येथे उपविभागीय कार्यालय खामगाव येथे सर्व पोलीस पाटलाच्या संघटनेने निवेदन देण्यात आले……



