आ. श्वेता महाले यांच्या विकासाच्या विचारांना युवा शक्तीची साथ,विकास लहाने, प्रमोद पाटील आणि रीकी काकडे यांच्यासह शेकडो काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

स्टार भारत लाईव्ह
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली -: विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाभिमुख वाटचालीवर विश्वास व्यक्त करत विविध पक्षांतील पदाधिकारी, नेते आणि युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष विकास लहाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद पाटील तसेच चिखली युवा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले रीकी काकडे यांच्या पक्षप्रवेशामुळे चिखली मतदारसंघातील भाजपला नवी संघटनात्मक ताकद मिळाली आहे.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि विकसित भारताच्या निर्मितीचा दृष्टिकोन, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्राच्या विकासासाठीची दूरदृष्टी आणि आमदार श्वेता महाले पाटील यांचे चिखली मतदारसंघातील विकासकामांसाठीचे प्रभावी नेतृत्व यावर विश्वास ठेवून हे पक्षप्रवेश झाले.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील विविध विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. विकासकामांना गती देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उपलब्ध राहणारे नेतृत्व म्हणून श्वेता महाले पाटील यांच्याबद्दलचा विश्वास या पक्षप्रवेशातून अधिक दृढ होत असल्याचे दिसून आले.
काटोड्यातून विकास लहाने यांच्यासह सहकाऱ्यांचा प्रवेश
मौजे काटोडा येथील युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्री. विकास लहाने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेंद्र लहाने, श्री. सर्जेराव भागिले, श्री. अनिल लहाने, श्री. सोहम धूड, श्री. चेतन धोंडगे, श्री. विकास गणेश लहाने, श्री. विजय थिगळे, श्री. बबलू थिगळे आणि श्री. अक्षय धूड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
काटोडा परिसरातील या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी त्यांच्या सहभागामुळे मतदारसंघातील विकासकामांना आणि जनसेवेच्या उपक्रमांना आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद पाटील भाजपात
चिखली मतदारसंघाच्या विकासाची दिशा आणि जनसेवेचा संकल्प यावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. प्रमोदजी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक-राजकीय कार्याचा पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रविकासाच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणाला बळ देण्यासाठी तसेच आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
रीकी काकडे यांच्यासह युवा शक्ती भाजपच्या प्रवाहात
चिखली युवा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रीकी काकडे यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह रुपेश काकडे, नीलेश बोथरे, शिवा ढडोरे, प्रज्वल शहाणे, प्रसाद पवार, कृष्णा गाडे, देवा नागरे, साहिल नवरंगी, वासद पठाण, मोहित काकडे, प्रशांत काकडे, विवेक काकडे, नंदकिशोर कोकरे, रितेश जाधव, रोहन तायडे, ओम गायकवाड, शुभम पडघान, आदित्य तेजनकर, कृष्णा कोथळकर, हर्षल गायकवाड, रवी तायडे, श्रावण प्रजापती, कैलास प्रजापती, ललित काकडे, पंकज इंगळे, संदीप देशमाने, दर्शन काकडे, निखिल ठोकणे, अभी महाले, साहेबराव कांबळे आणि अनिल पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
युवा शक्तीचा हा मोठा सहभाग हा चिखलीमध्ये भाजपच्या विकासाच्या विचारांना मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्याचे द्योतक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार श्वेता महाले पाटील यांनी भाजपा परिवारात प्रवेश केलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करून, “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देत चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष श्री. सागर पुरोहित, प्रा. श्री. वीरेंद्र वानखेडे, श्री. दीपक खरात, श्री. दीपक लहाने, श्री. राहुल सवडतकर,, श्री. अंकुशराव पाटील, माजी नगरसेवक श्री. विजय नकवाल, श्री. नितीन पाटील, श्री. प्रशांत देशमुख, श्री. सिद्धेश्वर ठेंग, श्री. सागर खरात, श्री. सुधीर तांबट आदी उपस्थित होते.



