बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक: आमदार मनोज कायदेंचे आव्हान,

शिंगणे-जाधव पॅनल विरुद्ध रंगणार लढत!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा:बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीला बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘सहकार पॅनल’ विरोधात सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ मैदानात उतरवून थेट आव्हान दिले आहे. आमदार कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ९ उमेदवारांची घोषणा केल्याने बँकेच्या सत्तेसाठी आता जोरदार रणधुमाळी उडणार आहे.

खामगावची सर्वपक्षीय बैठक निष्फळ

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. मात्र, जागावाटप आणि इतर समीकरणांवर एकमत न झाल्याने ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली. २१ संचालक पदांपैकी १२ उमेदवार आधीच अविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांवर सहमती न झाल्याने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

८ मतदारसंघांत ९ जागांसाठी लढत

बँकेच्या २१ संचालक पदांपैकी १२ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले असले, तरी उर्वरित ८ मतदारसंघांतील ९ संचालक पदांसाठी आता प्रत्यक्ष मतदान होणार आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील प्रस्थापित पॅनलला रोखण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’च्या ९ उमेदवारांमुळे प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

निवडणुकीचे पुढील महत्त्वाचे टप्पे

:१२ ऑगस्ट: अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी आणि निवडणूक चिन्ह वाटप.

२३ ऑगस्ट: सर्व मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार.

२४ ऑगस्ट: मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार.

सुरुवातीला अत्यंत शांत आणि बिनविरोध वाटणारी ही निवडणूक आता नाट्यमय वळणावर आली आहे. चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार असून, जिल्हा बँकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button