बेरोजगार प्रशांत पाटील बनला 3000 कोटींचा मालक*

*बेरोजगार प्रशांत पाटील बनला 3000 कोटींचा मालक*
55 अनधिकृत इमारतींचा मुख्य सूत्रधार प्रशांत पाटील नोकरीच्या शोधात आला होता मुंबईलाबाळू साळवे मुंबई बीरो चीप13 ऑगस्ट 2023 रविवारविरार:- सध्या गाजत असलेल्या वसई-विरार मधील 55 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रशांत पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधून नोकरी शोधण्यासाठी भावासोबत मुंबईत आला आणि बघता बघता 54 इमारतींचा बिल्डर बनला. त्याचे 3000 कोटींचे साम्राज्य उभे राहिले. त्याचा काळ्याकुट्ट प्रवास पोलिसांनी उघड केला आहे. त्याचबरोबर आणखी दोन अज्ञात बिल्डरांविरुद्ध बनावट कागदपत्रे वापरल्याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सर्व शासकीय यंत्रणांचे बनावट कागदपत्रे व बनावट शिक्के बनवून महारेराची फसवणूक करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला विरार पोलिसांनी अटक केली. मात्र सदर बनावट कागदपत्रांमुळे वसई-विरार परिसरातील 55 इमारती अनधिकृत ठरल्या असून त्यात राहणारे शेकडो रहिवासी अडचणीत आले आहेत.पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांमध्ये मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील, दिलीप बेनवंशी आणि राजेंद्र नाईक यांचा समावेश असून यामध्ये प्रशांत पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.प्रशांत मधुकर पाटील हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा! 2010 साली तो भावाबरोबर नोकरीच्या शोधात कशा मिळणार? असा प्रश्न प्रशांतला विचारला. त्यावेळी त्या सव परवानग्यांचे आपण बघतो, असे आश्वासन मच्छिंद्रला दिले. त्याने सर्वप्रथम राजेश नाईक याला गाठले. त्याच्या मदतीने त्याने इमारतीशी संबंधित विभागांचे बनावट लेटरहेड, रबरी शिक्के बनवून घेतले. या बनावट कागदपत्रांमध्ये सरपंचाचे लेटरहेड, रबरी शिक्के तसेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी नगररचना, उपसंचालक, दुय्यम निबंधक, एमएमआरडीए, वास्तु विशारद, महापालिका, सिडको आदींचे विभागांची बनावट लेटरहेड व रबरी शिक्यांचा समावेश होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे कोपरी गावामध्ये अनधिकृत रुद्रांश इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकल्यावर प्रशांत आणि मच्छिंद्र मालामाल झाले. सुरुवातीला सर्व खर्च मच्छिंद्रने उचलला. फ्लॅट विकल्यावर झालेल्या नफ्यातून मच्छिंद्रने 40 टक्के नफा प्रशांतला दिला. आणि मग बघता बघता त्यांची घौडदौड सुरू झाली.प्रशांत पाटील आणि मच्छिंद्र व्हनमाने यांच्या जोडीला दिलीप बेनवंशी, दिलीप अडखळे आणि राजेश नाईक अशी दमदार टीम मिळाली. आणि या टोळीने एक-दोन नव्हे तर चक्क 55 अनधिकृत इमारती उभारल्या. त्यांनी थोडं थोडके नव्हे तर चक्क 3 हजार कोटी रुपयांचे काळे साम्राज्य उभे केले.रुद्रांश रिअलटर्स या नावाने कंपनी स्थापन करणाऱ्या प्रशांतने अनेक मालमत्तांचे बनावट आराखडे बनविले. त्याचप्रमाणे पालिकेकडून सीसी आणि ओसी मिळवून महारेराची मंजुरीही मिळविली. या बनावट कागपत्रांच्या आधारे चक्क बँकांनाही गंडा घातला व कोट्यावधी रुपयांचे कर्ज इमारती बांधण्यासाठी घेतले. आपले फ्लॅट विकण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेतील अडीच लाख रुपयांची सबसिडीचेही आमिष दाखवले. अडीच लाख रुपयांचे सवलत मिळत असल्याचे पाहून शेकडो रहिवाशांनी पटापट फ्लॅट खरेदी केले.एकही कायदेशीर कागदपत्र नसताना व सरकारला एक रुपयाही कर न देता या टोळीने पहिल्याच इमारतीत 12 कोटी रुपये कमावले. त्यानंतर आरक्षित जमीन, सरकारी जमीन, आणि खासगी जमीन मालकांकडून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 55 इमारती उभारल्या.याप्रकरणी सदर टोळीला मदत केल्याच्या संशयावरून पालिकेतील अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्या मदतीशिवाय ही टोळी एव्हढा मोठा घरकुल घोटाळा करूच शकत नाहीत, असे पोलिसांना वाटते. पोलिस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत. शिवाय या टोळीने एकच फ्लॅट अनेकजणांना विकल्याची कुणकुण पोलिसांना लागली आहे. त्यामुळे या टोळीवर आणखी काही गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे.घोटाळ्या दरम्यान प्रशांत पाटीलचे येथे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध जुळले. त्याने तिच्याशी लग्न केले आणि आता त्यांना एक मूलही आहे. प्रशांत पाटील हा विरार पूर्व येथील रघुवीर समर्थ इमारतीमध्ये राहतो. घोटाळेबाज प्रशांतने आपल्या फ्लॅटच्या वीज मीटरमध्येही ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान घोटाळा केला आणि वीज चोरी केली. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच वीज वितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंत्याने वीज चोरी प्रकरणी प्रशांत पाटीलविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे मार्च 2023 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. प्रशांतने तब्बल 22 हजार 877 युनिट विजेची चोरी करून वीज मंडळाला 5 लाख 29 हजार रुपयांचा धक्का दिला होता.



