Uncategorized
अशी होते मांडणी

अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये गटाची मांडणी करण्यात येते. गटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मुंग, हरभरा ,जवस ,तीळ ,भादली, बाजरी ,तांदूळ ,अंबाडी ,सरकी , वाटाणा,मसूर ,करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीचे ढेकळे त्यावर पाण्याची भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी ,पुरी ,पापड, सांडोळी कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या गटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.



